ताज्या घडामोडी

सोयाबीन भरडी यंत्रात अडकुन महिलेचा मृत्यू : आकस्मित मृत्यूची नोंद


पुणे : दि 23/10/24 (बुधवार) भोर तालुक्यातील कुसगाव मध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली, सोयाबीन भरणाऱ्या महिलेचा हात अचानक भरडी / मळणी यंत्रात गेल्याने त्या मशिनच्या आत  ओढल्या गेल्या या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला,या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

सध्या सर्वत्र सोयाबीन काढण्याची लगबग सुरू असून त्यात हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्यामुळे प्रत्येक शेतकरी सोयाबीन काढण्यासाठी धावपळ करत आहे, याच धावपळीत भरडी यंत्रावर काम करत असताना सोयाबीन भरडून लवकरात लवकर कशा प्रकारे होईल, यासाठी धावपळ करताना हा अपघात झाला आहे.

Advertisement

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 10:00 वाजण्याच्या सुमारास बाळु गोरे व त्यांची पत्नी संगीता गोरे त्यांच्या घराच्या जवळ जनावरांच्या गोठ्यात काम करत होते त्यांचा भाऊ दत्तात्रय हा दूध घालण्यासाठी पुणे येथे गेला होता, भावजई सौ.रंजना दत्तात्रय गोरे वय 35 वर्ष यांच्या घरासमोर सोयाबीन भरडी मशीन आल्याने सोयाबीन भरण्यास सुरुवात केली होती, त्यानंतर 11:30 सुमारास आजूबाजूच्या लोकांचा आरडाओरडा केल्याचा आवाज आल्याने काय झाले आहे हे पाहण्याकरिता बाळू गोरे व त्यांची पत्नी सर्व संगीता गोरे असे हे दोघे तिकडे जाऊन पाहतात तर भावजई सोयाबीन भरडत असताना मशीनच्या पट्ट्यामध्ये साडीचा पदर अडकलेला दिसला, सोयाबीन भरडी मशीन मध्ये  अपघात घडल्याचे त्यांना दिसले त्या अपघातामध्ये सौ रंजना गोरे त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी  गंभीर जखमा झाल्या होत्या मशीन मधून त्यांना बाहेर काढून उपचाराकरिता श्लोक हॉस्पिटल कोंढणपूर फाटा येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले

दरवर्षी मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाल्याच्या घटनेमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे महिलांनी किंवा पुरुषांनी सुरक्षेच्या दृष्टीने भरडी / मळणी यंत्रावर काम करताना स्वतःच्या जीवाची काळजी घेणे गरजेचे आहे मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाल्याच्या घटनेमध्ये दरवर्षी वाढ होत आहे.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!