ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुक ! निगडी येथे नवोदित मतदारांसह शेकडो युवकांनी घेतली मतदानाची शपथ


 

निगडी : “प्रत्येक मत हे लोकशाहीचे बळ आहे. मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येकाने मतदानाचे कर्तव्य पार पाडावे आणि कुटुंब, मित्रांना प्रेरित करावे,” असे आवाहन महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने निगडीतील लाईट हाऊस येथे नवोदित मतदारांसह शेकडो युवकांनी मतदानाची शपथ घेतली.

महानगरपालिका आयुक्त व निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधीन स्वीप उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित झाला. जनता संपर्क अधिकारी पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात लाईट हाऊसचे पूजा मोगरे, लखन रोकडे, अभिजित कांबळे, दिपाली वाघुळे, अक्षता घारे, लुईस शेळके, छवी राठोड यांच्यासह शेकडो विद्यार्थी-युवक सहभागी झाले.

Advertisement

कार्यक्रमाची सांगता सुरुवातीला मतदान जनजागृतीवर आधारित पथनाट्य सादर झाले. यात प्रत्येक मताचे लोकशाहीतील अमूल्य महत्त्व अधोरेखित केले गेले. युवकांनी टाळ्यांचा कडकडाट करून कलाकारांचे कौतुक केले. त्यानंतर पुराणिक यांनी उपस्थितांना लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचा हक्क कसा कर्तव्य आहे, हे समजावून सांगितले. शेवटी सर्वांनी एकत्र येऊन १०० टक्के मतदान करण्याची शपथ घेतली.

पुराणिक म्हणाले, “भारतीय संविधानाने दिलेला हा हक्क बजावून लोकशाहीला बळकटी द्यावी. सामाजिक बांधिलकीतून परिसरातील नागरिकांना प्रेरित करा.” या उपक्रमाने युवकांमध्ये मतदानाबाबत उत्साह संचारला असून, निवडणुकीत उच्च मतदानाचा टार्गेट गाठण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!