मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत, पहिल्याच फाईलवर, पहिली सही
मुंबई : महायुतीच्या शपथविधी संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अर्ध्या तासाच्या मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत, पहिल्याच फाईलवर पहिली सही केली, मुख्यमंत्री सहायता निधीतुन पुण्यातील रुग्णास पाच लाखाची मदत केली.
महाराष्ट्र राज्याचे तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे हे मुख्यमंत्री सहायता निधीचे उद्दिष्ट असते, पूर दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत अर्थसहाय्य पुरवले जाते.
पुणे येथील चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीचे बोन मॅरो ट्रान्सफरंट उपचारासाठी 5 लाखाचे मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या, समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना, दुर्बल आजारावर उपचार करण्यासाठी या निधीतून अर्थसहाय्य पुरवले जाते.




