महायुतीचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न
राहुल रानडे,
प्रतिनिधी.
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली, मुंबई मधील आझाद मैदान या ठिकाणी हा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर अजित पवार यांनी 6 व्या वेळेस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, महायुतीच्या या शपथविधी सोहळ्यासाठी देशातून साधू- संत,विविध राज्याचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान,गृहमंत्री,उद्योजक, खेळाडू तसेच सेलिब्रिटींची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती.




