ताज्या घडामोडी

किकवी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास राजस्थान शासनाच्या अधिकाऱ्यांची भेट


 

कापूरहोळ : ग्रामपंचायत किकवी येथे जण सुविधा फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत किकवी यांच्या सहकार्याने सुरू असलेला तालुका स्तरीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रभावीपणे कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत दररोज सुमारे सात टन कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाते, प्रकल्पाच्या कार्यप्रणालीचा आढावा घेण्यासाठी राजस्थान शासनाच्या अधिकार्‍यांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत किकवी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट दिली, प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणी साठी सरपंच नवनाथ कदम यांच्या कार्याची राजस्थानच्या अधिकार्‍यांनी प्रशंसा केली.

Advertisement

ग्रामपंचायत किकवी येथे जनसुविधा फाऊंडेशनच्या सहकार्याने सुरू असलेला तालुका स्तरीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत यशस्वीरित्या कार्यरत आहे. या प्रकल्पात दररोज सुमारे ७ टन कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाते. प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी राजस्थान राज्यातील वरिष्ठ अधिकारी किकवी येथे आले होते.

या भेटीत राजस्थानचे कार्यकारी अभियंता नरेंद्र कुमार लखीवाल (जिल्हा अस्वर), रमेश कुमार मदन (जिल्हा श्रीगंगानगर), तसेच पुणे जिल्हा परिषदेचे विक्रम शिंदे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, उपअभियंता भामरे साहेब, विस्तार अधिकारी बी. बी. चकाले, सरपंच नवनाथ कदम, उपसरपंच भास्कर सकपाळ, आणि ग्रामविकास अधिकारी विजय गेजगे, बिराजदार यांनी सहभाग घेतला.जनसुविधा फाऊंडेशनच्या सुवर्णा वाकणकर आणि अविनाश ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचे आदर्श उदाहरण ठरत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!