क्राईम

राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हशींची चोरी ! शेतकऱ्याचे १ लाख २० हजाराचे नुकसान


कापूरहोळ : राजगड पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा एकदा जनावरांच्या चोरीची घटना उघडकीस आली आहे. मौजे निगडे, तालुका भोर येथे अज्ञात चोरट्यांनी शेतातील गोठ्यातून चार म्हशी चोरीला नेल्याची घटना समोर आली असून, एकूण १ लाख २० हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे.

फिर्यादी अक्षय केशव काकडे (वय २९, व्यवसाय शेती, रा. निगडे, तालुका भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास ते २९ ऑक्टोबरच्या सकाळी ७ वाजे दरम्यान ही चोरी झाली. फिर्यादी यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमधील गोट्यात ठेवलेल्या गावरान जातीच्या चार काळ्या रंगाच्या शिंगी असलेल्या म्हशी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत.

Advertisement

प्रत्येक म्हशीची किंमत सुमारे ३० हजार रुपये असून, एकूण नुकसान १ लाख २० हजार रुपयांचे झाले आहे.या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३९०/२०२५, भा.दं.वि. कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दखल अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के.जे. बर्कले यांनी नोंद घेतली आहे.

तपास पोलीस हवालदार कोल्हे (ब.नं. १८१६) करीत आहेत. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!