ग्रामपंचायत अधिकारी पदास मान्यता : शासन निर्णयाचे ग्रामसेवक संघटनेकडून पेढे वाटून, फटाके फोडून स्वागत
भोर : दि. 23/9/24 (सोमवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी पदाचे एकत्रीकरण करुन ग्रामपंचायत अधिकारी पदास मान्यता देण्यात आली. या निर्णयानंतर पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीने पंचायत समिती भोर येथे तालुका ग्रामसेवक संघटना भोरच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे वाटून, ढोल – ताशाच्या गजरात फटाके फोडून,आनंद साजरा केला.
ग्रामसेवक (एस – 8) व ग्रामविकास अधिकारी (एस – 12) ही दोन्ही पदे एकत्र करून त्यांना रुपये 25,500 / 81,100 या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मुळ पद कायम ठेवून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात आले आहे. तसेच नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदास दहा वर्षानंतरच्या सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी (एस – 14) वीस वर्षांच्या सेवेनंतरचा दुसरा लाभ सहायक गटविकास अधिकारी (एस – 15) व तीस वर्षांनंतरच्या सेवेचा तिसरा लाभ गटविकास अधिकारी (एस – 20) असा मिळेल.
याप्रसंगी पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियचे अध्यक्ष श्री अमोल घोळवे, सरचिटणीस श्री अनिल बगाटे, कार्याध्यक्ष श्री संदीप ठवाळ, कोषाध्यक्ष श्री संतोष भोसले, मार्गदर्शक श्री नवनाथ झोळ, ऑन. सेक्रेटरी ग्रामसेवक पतसंस्था पुणे श्री पद्माकर डोंबाळे, तालुका अध्यक्ष श्री अभय निकम, सचिव श्री विजय कुलकर्णी, हे उपस्थित होते
ग्रामपंचायत अधिकारी हा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डी एन ई 136) च्या अध्यक्ष श्री संजीव जी निकम, सरचिटणीस श्री सूचित घरत , व युनियन च्या सर्वच शिलेदारांचे पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.




