भोर पंचायत समिती सभापती आरक्षण जाहीर ! भावी सभापती पुरुषांचा पत्ता कट
भोर : भोर पंचायत समिती सभापतीपदाचे सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे.पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या पहिल्या अडीच वर्षांसाठीच्या सभापती पदांची आरक्षण सोडत दि. ९ ऑक्टोबर (गुरुवार) रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर झाली आहे, सध्या पंचायत समितीवर प्रशासक कारभार करत आहेत. महिला आरक्षण जाहीर झाल्याने पुरुष मंडळींचा पदरी निराशा पडली आहे. आता निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे.
सभापती आरक्षणानंतर सदस्यपदाचे आरक्षण पडणार आहे, की तालुक्यात ८ पंचायत समिती मतदारसंघ आहेत. सदस्यांमधूनच सभापतीपदाची निवड होणार आहे. त्यामुळे तालुक्याचा कारभार व्यवस्थित हाताळणाऱ्या महिलांची राजकीय पक्षांना निवड करावी लागणार आहे. अनेक भावी सभापती तालुक्याचे नेतृत्व करण्यास इच्छुक होते, परंतु त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा स्वप्न भंग झाला आहे.
जिल्हा परिषद गटाचे आणि पंचायत समिती गणाचे आरक्षण सोमवारी (दि. १३ ऑक्टोंबर) सोडत काढून जाहीर करण्यात येणार आहे. यातील जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर काढण्यात येणार आहे, तर पंचायत समिती गणाचे आरक्षण तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याच्या ठिकाणी काढण्यात येणार आहे.




