ताज्या घडामोडी

भोंगवली-कामथडी जिल्हा परिषद गटाने केला पक्का निर्धार ! सुसंस्कृत आणि निष्कलंक उमेदवार हाच एकमेव पर्याय !! पत्रकार वैभव धाडवे यांना जिल्हा परिषद सदस्य करण्यासाठी युवकांचा संकल्प !!!


कापूरहोळ : प्रश्न आमचे उपायही आमचाच असा ठाम निर्धार करत भोंगवली–कामथडी जिल्हा परिषद गटाने आगामी निवडणुकीत आपले भविष्य स्वतःच्या हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या नेत्यांनी विकासाचे आश्वासन देत जनतेचा विश्वास संपादन केला, परंतु आजवर जनतेच्या गल्लीतले साधे प्रश्नही न सुटल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

पाण्याची टंचाई, रस्त्यांची दयनीय अवस्था, शालेय सुविधा, रोजगाराचा अभाव अशा असंख्य समस्या कायम असल्याचे लोक सांगतात.या पार्श्वभूमीवर भोंगवली–कामथडी गटातील युवकांचा एकस्वर ठरला आहे,यावेळी सुसंस्कृत, निष्कलंक आणि लोकांच्या वेदनांची खरी जाण असलेलाच उमेदवार निवडायचा. या चळवळीत पत्रकार वैभव धाडवे यांचे नाव जोरात चर्चेत आले असून, जनतेत त्यांच्याबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

वैभव धाडवे यांनी गेली 18 वर्ष ‘दैनिक पुढारी’मध्ये पत्रकार म्हणून काम करत सामान्य माणसाचा आवाज बनण्याचं अवघड पण यशस्वी काम पार पाडलं आहे. त्यांच्या बातम्यांमधून समाजातील अन्याय, असमानता आणि स्थानिक प्रश्न नेहमीच ठळकपणे पुढे आले. लोककल्याणाच्या कामात सदैव सक्रिय असलेल्या धाडवे यांनी सामाजिक बांधिलकीला प्राधान्य दिलं आहे. त्यांच्या पत्रकारितेतील प्रामाणिकतेमुळे आणि परखड यभूमिकेमुळे लोकांनी त्यांच्याकडे सक्षम नेतृत्व म्हणून पाहायला सुरुवात केली आहे.

समाजाचा आग्रह, जनतेतील आत्मीयता आणि तळमळीचा ओघ पाहता वैभव धाडवे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरायचा निर्णय घेतला आहे. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे सत्ता नव्हे, सेवा, पद नव्हे, परिवर्तन हवे त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर गटात प्रचंड उत्साह असून युवकांनी “आमचा माणूस, आमचं नेतृत्व” या हाकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

पत्रकार वैभव धाडवे यांच्या मैदानात उतरल्याने प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून राजकीय समीकरणांनाही कलाटणी मिळाली आहे. गटात “स्वतःचे प्रश्न, स्वतःचे समाधान” ही भावना पुन्हा पेटून उठली आहे. जनतेचा विश्वास, तरुणाईचा उत्साह आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाण घेऊन वैभव धाडवे आता जनतेच्या आशीर्वादाने परिवर्तनाचा प्रवास सुरू करण्यास सज्ज झाले आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!