सारोळा गावच्या इर्शाद शेख आत्महत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा ! राजगड पोलिसांकडून तब्बल ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल
सारोळा : पुणे-सातारा महामार्गालगतच्या सारोळा (ता.भोर) गावातील मुस्लिम दफनभूमी परिसरात पहाटे ३:३० ते ६:०० वाजण्याच्या दरम्यान इर्शाद इमाम शेख वय ४० वर्ष, रा.पांडे, ता.भोर या मुस्लिम तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.
मृत इर्शाद शेख यांचा लहान भाऊ आसिफ इमाम शेख वय ३८ वर्ष सध्या राहणार वडगाव-मावळ, पुणे याने राजगड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असुन या घटनेत तब्बल ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे पुर्ण भोर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा माने, प्रशांत माने,सुशांत करंजकर, ओंकार भोसले व इतर ३० ते ४० जणांनी मृत इशादला शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास देत असल्यानेच त्यांच्या या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
राजगड पोलिसांनी पूजा माने व इतर संशयतांवर कलम १०८, १८९(२), १९१(२), ११५(२), ११८(१), ३५२,३५१(२),(३) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई करत आहेत.




