जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडत १३ ऑक्टोंबरला : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्य पदांसाठीच्या आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर २०२५ होणार असुन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या ७३ सदस्य पदांकरिता आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात दुपारी १२:०० वाजता होईल.
पंचायत समिती सदस्य पदासाठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार १३ ऑक्टोंबर याच दिवशी संबंधित तालुक्यांमध्ये दुपारी १२:०० वाजता पंचायत समिती सदस्य पदांकरिता आरक्षण सोडत काढण्यात येईल.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियम २०२५ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखीव जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव जागा निश्चित करण्यात येतील.
भोर पंचायत समिती सदस्यांचे आरक्षण सोडत १३ ऑक्टोंबर सोमवार रोजी दुपारी १२:०० वाजता भोर मधील अभिजीत मंगल कार्यालय (भोर-महाड रोड) येथे निवडणूक अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.




