ताज्या घडामोडी

भोरच्या भविष्यासाठी निर्णायक सभा ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भव्य जाहीर सभा


 

भोर : उद्या रविवार ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता भोर शहरात महत्त्वपूर्ण राजकीय कार्यक्रम पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजितदादा पवार यांची भोर नगरपालिका निवडणूक प्रचारा निमित्त भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपालिकेच्या भविष्यासाठी ही सभा अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

भोर नगरपालिका शाळा मैदानावर भोर पोलीस स्टेशन समोर हा कार्यक्रम होणार असून पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असुन काही तर पक्षातील पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा दर्शवणार आहेत.यंदाच्या निवडणुकीत २० उमेदवार नगरपरिषद सदस्य पदासाठी आणि १ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी असून प्रत्येकाच्या प्रचार जोरदार चालू असून त्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या जाहीर सभेमुळे स्थानिक राजकारणाला नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या विकासासाठी ठोस योजना राबविण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. निवडणूक प्रचारात महत्त्वाचा टप्पा म्हणून या सभेला कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत.

भोरमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत विकासाकडे वाटचाल करणारे, शहरातील विविध समस्या सोडविण्यास कटिबद्ध असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून देण्याचे आव्हान मतदारांना यावेळी करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही सभा भोर मधील विकासाची नवी गती देईल असे स्थानिक राजकीय विश्लेषक मानतात. भविष्यातील प्रगतीसाठी लोकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, हा या कार्यक्रमाचा मुख्य संदेश आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!