क्राईम

आडवी आली जात म्हणून : भावानेच केला बहिणीचा घात


सतिश मुसळे,
प्रतिनिधी.

वळद : प्रेम ही जगातील सर्वात चांगली, महत्वाची भावना समजली जाते, आपल्यावर कोणीतरी प्रेम करावं असं जगातील प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. पण याच प्रेमामुळे एखाद्याचा जीव गेला तर प्रेम करण्याची जीवघेणी शिक्षा कोणी दिली, तर कोणाकडे दाद मागायची असे अनेक प्रश्न निर्माण होतात,

आरोपीच्या बहिणीने गावातील एका आंतरजातीय तरूणावर प्रेम केल्याने तिच्या भावाला एवढा प्रचंड राग आला की त्याने त्याच्या बहिणीला प्रेम करण्याची शिक्षा देत 200 फूट उंच डोंगरावरून खाली खोली दरीत ढकलून दिलं. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथे घडली असून त्यामध्ये अवघ्या 17 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरूणाला अटक केली आहे. मृत मुलगी ही त्याची चुलत बहिण होती.

Advertisement

या घटनेमुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. नम्रता गणेश शेरकर (शहागड, तालुका अंबड) असे मृत मुलीचे नाव असुन, ऋषिकेश तानाजी शेरकर असे आरोपी भावाचे नाव आहे. जीवाला घरच्यांकडून धोका आहे, अशी तक्रारही नम्रताने शहगड पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर घरच्यांनी समजूत काढण्यासाठी मुलीला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते. 8 दिवसापासून वळूज काकांकडे  राहण्यास आली होती. काका तानाजी आणि भाऊ ऋषिकेश यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यात सोमवारी दुपारी ऋषिकेश बहिणीला गोड बोलून खावडा डोंगरावर घेऊन आला. तिथं तिच्याशी बोलता-बोलता त्यानं तिला 200 फूट दोंगरावरून खाली ढकलून दिलं. सुरुवातीला मुलीनं आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षदर्शीनी या घटनेसंदर्भात माहिती दिली असता हा खून असल्याचं निष्पन्न झालं. घटना घडली तेव्हा तिथं क्रिकेट खेळत असलेल्या युवकांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यावरुन आरोपी भाऊ ऋषिकेश याला एम.आय.डी.सी वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतलं.

मात्र पुरोगामी महाराष्ट्रात जात कधी पर्यंत प्रेमाचा घात करून तरुण-तरुणीच्या जीवावर उठत राहणार हा खरा प्रश्न आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!