सामाजिक

सिद्धिविनायक हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम ; आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची जयंती, पत्रकारांचा सत्कार, रुग्णांना फळे वाटप.


नसरापूर : 6 जानेवारी 2025 मराठी पत्रकार दिन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे अवचित्य साधून सिद्धिविनायक हॉस्पिटल डायरेक्टर राजेंद्र डिंबळे, व त्यांच्या सौ. संगीता डिंबळे या दापत्याने दरवर्षीप्रमाणे पत्रकार दिन साजरा करत हॉस्पिटल मधील रुग्णांना फळे वाटप केली व पत्रकार दिनानिमित्त प्रिंट मिडिया व डिजिटल मिडिया पत्रकारांचा सन्मान  केला.

महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा 6 जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीला महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत,यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते. जुलै 1840 मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

Advertisement

भाषेत गोविंद कुंटे (भाऊ महाजन) यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आला होता, त्याचवेळी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.

यावेळी डॉ. राजेंद्र डिंबळे, डॉ. संगिता डिंबळे, पत्रकार किरण बधे, वैभव भुतकर, वैभव धाडवे, विठ्ठल पवार, माणिक पवार, तुषार सणस, दिपक महांगरे, विशाल शिंदे, राजेंद्र वाघमारे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवनाना कोंडे, केळवडे गावचे प्रगतशील शेतकरी जायगुडे, विजय जंगम, नसरापूर गावचे विद्यमान सरपंच उषा कदम, उपसरपंच सुधीर वाल्हेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!