क्राईम

सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षचालकाची आत्महत्या ; पत्नीकडे पैसे नसल्याने इलेक्ट्रॉनिक भट्टीमध्ये जाळण्याचे भावनिक आव्हान


सचिन डांगे,
प्रतिनिधी.

चिंचवड : पिंपरी- चिंचवड येथे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील राजु राजभर नावाच्या एका तरुण रिक्षाचालकाने खाजगी सावकाराकडून 10 टक्के व्याजाने पैसे घेतले होते, त्यांचे पैसे भागवण्याकरिता त्याने बँकेतून व फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून आरोपींना व्याजाचे पैसे मुद्दलासह परत देऊनही अजून पैसे द्यावेच लागतील असा तगादा लावून बायको व मुलांना उचलुन जाऊ व जिवे मारण्याची धमकी देत असत अशा रोजच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहली व व्हिडीओ शुट केला आहे.

राजु राजभर याने स्वतः ला का संपवलं आहे याबद्दलचा धक्कादायक खुलासा केला आहे, या व्हिडीओमध्ये राजूने, “मला मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, मला माफ करा,” असं म्हणताना दिसत आहे.

Advertisement

व्हिडीओमध्ये राजूने कोणते सावकार त्याला त्रास देत होते त्यांचा उल्लेख केला आहे. 1) रजनी सिंग 2) राजीव कुमार उर्फ गुड्डू भैया 3) महादेव फुले 4) हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे या चार बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतोय असं राजूने या आत्महत्यापूर्वीच्या व्हिडीओत म्हटलं आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्येही राजूने या चौघांचाचा उल्लेख केला आहे.

तसेच त्याने चिठ्ठीमध्ये बायकोची व दोन्ही मुलाची माफी मागितली आहे, त्याच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्या पत्नीकडे पैसे नसणार असा उल्लेख करून त्याला इलेक्ट्रॉनिक भट्टीमध्ये जाळा असे भावनिक आव्हान त्याने चिठ्ठी आणि व्हिडीओमध्ये केले आहे, या घटनेनंतर निगडी पोलिसांनी महाराष्ट्र सावकार अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून दोघांना बेड्या ठोकल्या असून वरिष्ठ पोलीस अधिकारी पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!