राजापूर गावात घराची कडी,कोयंडा तोडून ८६,४०० रुपयांची चोरी
सारोळा : भोर तालुक्याच्या पुर्व भागातील राजापूर गावात एका घराची कडी, कोयंडा तोडून ८६ हजार ४०० रुपये किंमतीच्या सोन्याची चोरीची घटना घडली आहे. शुक्रवारी १८ जुलै सायंकाळी ६:०० वाजता ते शनिवार १९ जुलै रोजी सायंकाळी ५:३० च्या दरम्यान ही घटना घडली आहे. तुषार वसंत मोरे यांनी चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे. राजगड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुषार वसंत मोरे वय ४० वर्ष हे नोकरी निमित्त वानवडी येथे राहत असुन राजापुर गावातील घर त्यांचे बंद असल्याने अज्ञात चोरट्यांनी घराची कडी, कोयंडा तोडून घरात प्रवेश करुन कपाटा मधील १) एक ८ ग्रॅम वजनाची सोन्याची गळ्यातील चैन एकूण ६४,००० रूपये २) २ नग १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील पुड्या ८,००० रूपये ३) १ नग १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लहान मुलाचे गळ्यातील ८,००० रूपये ४) ८० ग्रॅम वजनाचे चांदीचे हातातील कडे व पायातील वाळे ६,४०० रुपये असे एकूण ८६,४०० रूपये सोने-चांदीचे दागिने चोरुन नेले आहे.
अज्ञात चोरट्याच्या विरोधात राजगड पोलिस स्टेशन मध्ये गु.र.नं. २८१/२०२५ भा.न्या.सं. कायदा कलम ३०५, ३३१ (३), ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असुन राजगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी पुढील तपास करत आहेत.




