क्राईम

भोर तालुक्यातील दोन वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ : राष्ट्रवादी काँग्रेस (SP) जिल्हाअध्यक्षाकडून राजगड पोलिसांना निवेदन


नसरापूर : दि. 21/09/24 (सोमवार) भोर तालुक्यात दोन वर्षीय बालिकेवर एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. पिडित बालिका आणि अज्ञात आरोपीचे घर शेजारी-शेजारी असुन संबंधित अल्पवयीन आरोपीच्या घरी रोज खेळण्यास जात होती, मंगळवारी दि. 17 सप्टेंबर  2024 रोजी पीडित मुलीची आई कपडे धुवत असताना आरोपींने या मुलीला खोलीत बोलावून घेऊन आतून कडी लावून घेतली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्यानंतर तिच्या ओरडण्याचा आवाज आईच्या कानावर येताच तिच्या आईंने बंद असलेले खोलीकडे धाव घेऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीने दरवाजा उघडला नाही आणि तिच्या आईने मोठ्याने आजूबाजूला आरडाओरडा केल्यानंतर त्या मुलाने दरवाजा उघडून मुलीच्या आईला कोयत्याने जीव मारण्याची धमकी दिली, आणि तिथून त्याने संधी मिळताच पळ काढला.                सदर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असल्याने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता राजगड पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत त्याला ताब्यात घेउन त्यावर गुन्हा दाखल केला. आणि त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार त्याची रवानगी बालसुधागृहात करण्यात आली. राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पुणे जिल्हाध्यक्षा-वकील दुर्गा सीता रामदास चोरगे, भोर तालुका काँग्रेस महिला अध्यक्ष गीतांजली शेटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महिला अध्यक्ष भोर विद्या यादव या विरोधात आपला निषेध व्यक्त करीत या आरोपीवर तात्काळ कठोर शिक्षा करावी, तसेच महिलांच्या आणि समस्त मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, अन्यथा अशी गेंड्याच्या कातडीचे नराधम जर कठोर शासन झाले नाही तर भविष्यात यांना कायद्याचा धाक राहणार नाही, यातून फाजील आत्मविश्वास वाढून कायदा सुव्यवस्थेला फास लावण्याचा कुप्रकार घडेल आणि तो कुठेतरी थांबावा याप्रश्नी दि. 22 सप्टेंबर 2024 रोजी ग्रामस्थ महिला वर्गाच्या उपस्थितीत राजगड पोलीस ठाणे येथे कठोर कारवाई व्हावी यासाठीचे निवेदन पत्र देण्यात आले. प्रसंगी निवेदन देताना उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, पोलीस निरीक्षक राजेश गवळी, उपनिरीक्षक वृषाली देसाई, उपनिरीक्षक संजय डावरे आदि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!