पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबाच्या यात्रेची सांगता
सासवड : श्री क्षेत्र वीर ता. पुरंदर येथे माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर ‘सवाई सर्जाचा’ जयघोष करत श्रीनाथ म्हस्कोबांचा व देवी जोगेश्वरी माता यांचा विवाह सोहळा शाही थाटात झाल्यानंतर यात्रेला खरी सुरुवात होते.मानाच्या पालख्या व वस्त्र परिधान केलेल्या काठ्यांची पारंपरिक भेट होते या वर्षी ते13 दिवस चाललेल्या उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, रंगिबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती. देवाचा लग्नसोहळा, यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक वीर येथे दर्शन घेण्यासाठी आले होते.
नाथ साहेबांच चांगभलं, सवई सर्जाच चांगभलं असा जयघोष करत आणि रंगाची शिंपण करत वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवीच्या यात्रेचची रविवारी सांगता करण्यात आली, ही यात्रा मागील 13 दिवसापासून सुरू होती मारामारी अर्थात रंगाचे शिंपण करून यात्रेची सांगता करण्यात आली, रविवारी दुपारी देवाच्या अंगावर रंगाची शिंपण करण्यात आली आणि यानंतर तोच रंग भाविक भक्तांचा अंगावर टाकण्यात आला, या रंगाच्या उधळणीला मारामारी असे देखील म्हटले जाते, मागिल 13 दिवसापासून वीर येथे श्रीनाथ मस्कोबा आणि जोगेश्वरी माता देवीची यात्रा उत्सव सुरू होता.
रविवारी यात्रेचा शेवटचा दिवस होता आहे त्यानिमित्ताने वीर येथे लाखोच्या संख्येने भाविक या यात्रा उत्सवात सहभागी झाले होते.




