विघ्नहर्ता पतसंस्थेचा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न : संस्थेचे कार्य सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी : मकरंद अनासपुरें (सिनेअभिनेते)
किकवी : भोर तालुक्यातील धांगवडी येथील बळीराजा मंगल कार्यालयात विघ्नहर्ता नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव समारंभ दि. २२ ऑगस्ट (शुक्रवार) रोजी संपन्न झाला.
यावेळी बोलतांना पतसंस्था ही केवळ नफेखोरीसाठी नसावी तर सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी कार्यरत राहिली पाहिजे. लोकांनी लोकांसाठी उभी केलेली पतसंस्था समाजाच्या गरजा भागविण्यासाठी कायम सक्रिय असली पाहिजे. विघ्नहर्ता पतसंस्था गेली दोन तप हीच वाट चालत आहे, याचा मला अभिमान वाटतो असे प्रतिपादन सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.
पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत बाठे यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब मुलामुलींना खेळासाठी मदत, वारकऱ्यांना मोफत पाणी टँकर, भोजन साहित्य, टाळ–पखवाज वाटप, आरोग्य सुविधा, पैलवानांना कुस्ती मॅट व कबड्डीसाठी साहित्य, मोफत शिलाई मशीन, पीठ गिरणी, विद्यार्थ्यांना गणवेश अशा विविध उपक्रमांद्वारे सामाजिक काम करण्यात आले आहे.
यावेळी आमदार शंकर मांडेकर म्हणाले विघ्नहर्ता पतसंस्था ही खरोखरच समाजातील सर्वसामान्यांना हातभार लावणारी संस्था ठरली आहे. शिक्षण घेणाऱ्या मुलांना तसेच खेळाडूंना दिलेले प्रोत्साहन व आर्थिक मदत कौतुकास्पद आहे. समाजातील वंचित घटकांसाठी या संस्थेचे कार्य प्रेरणादायी आहे.
पतसंस्थेचे सचिव सचिन काळुराम महांगरे यांनी वार्षिक अहवाल सादर करताना माहिती दिली की संस्थेचे एकूण २८३० सभासद असुन. भाग भांडवल १ कोटी ३५ लाख, ठेवी १९ कोटी, कर्जवाटप १२ कोटी, तर गुंतवणूक ७ कोटी इतकी असून संस्थेला ‘अ’ वर्गाचा आँडिट दर्जा प्राप्त झाला
कार्यक्रमाला आमदार शंकर मांडेकर, जि.प.माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, माजी जि. प. सदस्य चंद्रकांत बाठे,जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक भालचंद्र जगताप, माजी सभापती सुनिता बाठे, तसेच विजय टापरे, प्रकाश तनपूरे, गणेश बागल, अजय जाधव,पै.दत्ता शिंदे, विशाल कोंडे, सारीका कोंढाळकर, काळुराम महांगरे, प्रविण जगदाळे, सुनिल धाडवे, ज्ञानेश्वर चव्हाण, सुर्यकांत हांडे, संदीप नेवसे, युवराज कारळे, सुनिल जाधव, प्रमिला चव्हाण, गणेश निगडे, पंकज धुमाळ, देवा मसुरकर, मनोज खोपडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रौप्य महोत्सव समारंभाचे सूत्रसंचालन विठ्ठल पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकाश तनपुरे यांनी मानले.या कार्यक्रमाचे नियोजन राजगड पब्लिकेशन प्रा. लि. यांच्या वतीने जीवन सोनवणे यांनी केले होते.




