महाराष्ट्र पोलिस मित्र समिती पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी सागर बोरकर यांची निवड
पुणे : रक्षक संघ संलग्न महाराष्ट्र पोलीस मित्र समितीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीमध्ये पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी भोर तालुक्यातील कापूरहोळ येथील सागर रामदास बोरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही घोषणा दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी महा-राज्य अध्यक्ष मा. किरणदादा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली आहे, रजि. क्र. महा/९१२/२०२२ पुणे असलेल्या या समितीने जिल्हा, तालुका व शहर पातळीवर कार्यकारिणीची रचना केली असून, सागर बोरकर यांना पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे.
पोलिस प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वाढवण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या या समितीच्या माध्यमातून समाजहितासाठी प्रभावी उपक्रम राबवले जातील पोलीस मित्रांनी एकत्र येऊन गावपातळीपर्यंत पोहोचून मोठे कार्य साध्य करु असा विश्वास सागर बोरकर यांनी स्वराज महाराष्ट्र न्युजशी बोलतांना व्यक्त केला.
महाराष्ट्र पोलीस मित्र समितीच्या या निर्णयाचे पोलीस मित्र व स्थानिक नागरिकांकडून स्वागत होत असुन भोर तालुक्यातुन बोरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




