ताज्या घडामोडी

लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे अधिवेशन संपल्यानंतर मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. ही एक सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर जुलै पासून लगेचच या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. जुलै पासूनचे ते नोव्हेंबर पर्यंतचे पाच हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते, मात्र आता डिसेंबरचा हप्ता सरकार कधी जमा करणार याकडे सर्व लाडक्या बहिणीचे लक्ष लागले होते, खात्यामध्ये 2100  जमा होणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सभागृहात दिले

Advertisement

आमची एकही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाहीत, आपण ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देणार आहोत.

लाडकी बहीण योजनेचे निकष? अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न कमी आहे, अशा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. निकष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक अर्जदार महिलेला या योजनेचा लाभ सरकार देणार आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!