शिक्षण

RTE प्रवेश प्रक्रिया सुरू : पहिली ते आठवीपर्यंत मिळणार मोफत शिक्षण


पुणे : RTE Admission 2025 शिक्षण हक्क कायदा (Right To Education) खाजगी प्राथमिक शाळा मधील 25% जागावर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते, RTE ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला बुधवार दिनांक 18 /12/ 2024 पासून सुरुवात झाली आहे.

RTE  प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. RTE प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे बुधवार पासून RTE खासगी शाळा प्रवेश नोंदणीला सुरुवात होणार आहे. प्रत्यक्ष विद्यार्थ्याची नोंदणी प्रक्रिया ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून होणार आहे. मार्च महिन्यात विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच जून-जुलै महिन्यांतच प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.

Advertisement

RTE प्रवेश प्रक्रियेचा मुहूर्त ठरल्याने आता पालकांची प्रतीक्षा संपली आहे. कारण बालकांच्या मोफत व शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत दिल्या जाणाऱ्या RTE प्रवेश प्रक्रियेतील पहिला टप्पा बुधवार पासून सुरू झाला आहे. राज्यातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये RTE मार्फत मोफत प्रवेश देण्यात येतो. त्या अनुषंगाने ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शाळा नोंदणीची प्रक्रिया ही साधारण 3 आठवडे असणार आहे.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होऊ शकते. त्यानंतर प्रवेशाची लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा पहिल्यांदाच जून-जुलै महिन्यात संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नियमित वेळेत RTE अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचे वर्गही सुरू होऊ शकतील. एकीकडे डिसेंबर महिन्यात CBSE शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असली, तरी RTE प्रवेश प्रक्रियेला मात्र मुहूर्त लागत नव्हता. अखेर यंदा संबंधित प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्व तयारी कार्यशाळा  जानेवारीऐवजी आता 15 डिसेंबरलाच घेतली जात आहे. विशेष म्हणजे अंतिम प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी 10 एप्रिलवरून आता 10 मार्च करण्यात आला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!