ताज्या घडामोडी

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाडसी कारवाई ! औषधाच्या आडून गोवा दारू तस्करीचा पर्दाफाश !! ४३ लाखांचा माल जप्त !!! २ अटक


 

कापूरहोळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाने भोर तालुक्यातील सारोळा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर धाडसी कारवाई करून औषधाच्या आडून गोवा निर्मित प्रतिबंधित विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. विविध ब्रँडच्या १८६ दारूच्या बाटल्या, ट्रक, चारचाकी वाहन व मोबाईलसह एकूण ४३ लाख ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संपत लक्ष्मण गावडे (५९, आंबेगाव बुद्रुक) व समीर गणपत राऊत (पुणे) यांना अटक करण्यात आली आह़े.

Advertisement

अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनात गस्तीवर असलेल्या पथकाने १७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता संशयित ट्रक थांबवला. चालकाने औषधे असल्याचे सांगितले, मात्र तपासणीत औषधांच्या खाल्लोखाल १८६ प्रतिबंधित दारूच्या बाटल्या सापडल्या. ट्रक व मोबाईलसह १७ लाख ९९ हजार ३६० रुपयांचा माल जप्त केला.

तपासा दरम्यान आंबेगाव बुद्रुक येथे छापा टाकून राऊतला पकडले. त्याच्या चारचाकी वाहनातही दारू आढळली. गावड्याच्या घरात धाडस मारून आणखी दारू जप्त केली. अधीक्षक कानडे, उपअधीक्षक सुजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक संभाजी बर्गे, दुय्यम निरीक्षक प्रदीप मोहिते, प्रणव मेहता व शितल शिंदे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!