पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये १ हजार ८० जागा भरणार ! भरती प्रक्रियेत पारदर्शकता हवी, कोणतीही गडबड नको : अजित पवार
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (२६ सप्टेंबर) अल्पबचत भवन येथे झाली. बँकेची १ हजार ८० जागासाठी भरती प्रक्रियेबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सांगितले की भरती करताना जिल्ह्यातील सभासद असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय दिला जाईल व भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
अजित पवार पुढे म्हणाले बँकेत एकूण १ हजार ८० जागांची भरती प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात ३०० हून अधिक जागांची भरती केली जाईल. तसेच पुढील काही दिवसांत आणखी ३७५ जागांसाठी अशी टप्याटप्प्यानी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. तसेच ही भरती प्रक्रिया रिझर्व्ह बँकेने (RBI), सहकार खाते आणि नाबार्ड (NABARD) यांनी ठरवून दिलेल नियमांनुसारच होणार असून भरती प्रक्रिया होईल असे त्यांनी सांगितले.
भरती प्रक्रियेमध्ये एका जागेसाठी दर २५ लाख रुपये ठरल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. असे प्रकार झाल्यास सर्वसामान्य घरातील मुलांवर अन्याय होईल, भरती प्रक्रियात काही गडबड झाल्याचे माझ्या कानावर आले, तर कोणालाही माफ केले जाणार नाही.भरती प्रक्रियेत पारदर्शकतेवर भर देत बँक संचालक मंडळाला कठोर शब्दांत इशारा दिला आहे. भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार किंवा गडबड झाल्यास, ते सहन केले जाणार असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
यावेळी राज्याचे कृषिमंत्री आणि बँकेचे संचालक दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी मंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील, दिलीप मोहिते आणि अशोक पवार यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई उपस्थित होते. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने केलेली कामगिरी आणि संचालक मंडळाच्या कारभाराचे कौतुकही अजित पवार यांनी केले.




