निरा येथे दुर्गामाता दौडला कारची धडक : तीन तरुण गंभीर जखमी
निरा : पुरंदर तालुक्यातील निरा येथून एक धक्कादायक घटना घडली निरा येथे दुर्गामाता दौडला भरधाव कारची धडक तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात दुर्गा माता दौडचं आयोजन केलं जाते पुरंदर तालुक्यातील निरा येथे देखील गेल्या पाच वर्षांपासून दुर्गा माता दौड आयोजन केले जाते आज या दुर्गामाता दौड मध्ये अत्यंत गंभीर प्रकार घडला दुर्गामाता दौडला अचानक कारने धडक दिली या धडकेत दौड मधील तीन तरुण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार MH 14 ZX 3701 या नंबरची कारने दुर्गामाता दौंड मध्ये पायी चालणाऱ्यांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने या दुर्गामाता दौड मधील तिघेजण गंभीर जखमी झालेले आहेत यामध्ये अभिषेक मच्छिंद्र लकडे वय 23 वर्ष, जय रूपचंद चव्हाण वय 32 वर्ष, अजय दीपक पोटे वय 24 वर्ष हे सर्व राहणार निरा येथिल राहणारे असुन तिघेही या अपघातात गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे व यांना उपचारासाठी लोणंद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
दुर्गामाता दौडमध्ये अशा पद्धतीने अपघात झाल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे या तरुणांच्या तब्येतीबाबती देखील काळजी व्यक्त केली जात आहे दुर्गामाता दौंड मधील सहभागी सर्वच निरा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन संबंधित कारचालकावर गुन्हा दाखल केला असून घटनेच्या पुढील तपास नीरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.




