पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस : शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
जुन्नर : रविवार 13 एप्रिल 2025 रोजी मढ पांगारी या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य अवकाळी पाऊस सायंकाळी 4 वाजता चालू झाला होता जवळ-जवळ दीड तास पाऊस झाला असून पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते तर काही भागांमध्ये शेतीमधून पाण्याचे लोंढेच लोंढे वाहत असताना दिसत होते, अचानक झालेल्या पावसामुळे अक्षरशा शेताचे तळे झालेले दिसत आहे.
या अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिका बरोबर शेत शिवाराचे मोठे नुकसान झाले असून आंब्याच्या झाडांची कैऱ्या मोठ्या प्रमाणात खाली पडल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले असून बाजरी, कांदा, टोमॅटो या प्रमुख पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून उन्हाळी बाजरीचे उभे पीक अक्षरशा जमीनदोस्त झाले आहे.
महाराष्ट्रात एकीकडे उन्हाचा पारा वाढत चाललेला आहे तर दुसरीकडे काही भागात वातावरणातील मोठ्या बदलामुळे अचानक मुसळधार पाऊस पडत असून आज मढ पांगारी गाव शिवारात अचानक पडलेल्या पावसामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेले आहे.




