ताज्या घडामोडी

न्हावीचा सुपुत्र एमपीएससीत झळकला ! राहुल सोनवणेंचा श्रेणी-१ गौरव !! गावातील शाळांकडून भव्य सत्कार


सारोळा : न्हावी येथील जि. प. प्राथमिक शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थी राहुल अरुण सोनवणे (उपविभागीय जलसंधारण अधिकारी-श्रेणी-1) यांचा एमपीएससी निवडीबद्दल सत्कार करण्यात आला, विद्यार्थ्यांसाठी हा सोहळा उज्ज्वल दिशादर्शक ठरला.परिश्रम, इच्छाशक्ती, संघर्षशीलता आणि स्वप्नांवरील विश्वासाने राहुल यांनी हे यश मिळवले.

यावेळी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुस्तक आणि गुलाब पुष्पांनी सत्कार झाला, वडील कै. अरुण सोनवणे यांच्या अकाली निधनानंतर भाऊ आनंद अरुण सोनवणे यांनी खंबीरपणे कौटुंबिक जबाबदारी सांभाळली. माता सुजाता सोनवणे यांचे त्याग, कष्ट आणि प्रेरणा यशाचे आधारस्तंभ आहेत.

Advertisement

कार्यक्रमात ग्रामपंचायत सरपंच शीतलताई सोनवणे, संजय कांबळे, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक, जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका ललिता भोसले, जनार्दन सोनवणे (काका), आनंद सोनवणे (भाऊ), नवनाथ सोनवणे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन, दत्तात्रय कारळे, सचिन सोनवणे (माजी एसएमसी अध्यक्ष) उपस्थित होते.

साहेबांचे यश पाहायला वडील हवे होते  या आठवणीने आनंद सोनवणे यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. भावासाठी केलेला त्याग समाजासाठी आदर्श ठरला. शीतल सोनवणे, संजय कांबळे, आनंद व सचिन सोनवणे यांच्या मनोगतात राहुल यांच्या धडाडीचे, प्रामाणिकपणाचे आणि जिद्दीचे कौतुक झाले.

राहुल यांनी बालपणापासून यशापर्यंतचा प्रवास सांगितला आणि स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले.प्रास्ताविक मयुरा पाटणकर, सूत्रसंचालन अनिल चाचर, आभार अनिता पोतेकर यांनी केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!