ताज्या घडामोडी

भोर तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांची घटनात्मक बैठक मा.आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत संपन्न


भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची घटनात्मक बैठक मा.आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत संपन्न

कापूरहोळ : भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी धांगवडी येथे शिवाजीराजे इंजिनिअरिंग कॉलेजच्या येथे मा. आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत पार पडली, या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनिती, संघटन बळकटी आणि जनतेच्या विश्वासाचा पुनरुज्जीवन यावर व्यापक चर्चा झाली.

Advertisement

भोर तालुक्यातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंडल पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीला उत्साही वातावरण होते आणि विविध पक्ष संघटनात्मक योजना, नवीन संपर्क उपक्रम, तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कसे करावे यावर महत्त्वपूर्ण विचारमंथन झाले. आगामी निवडणुकांसाठी पक्षाचा प्रचार करताना संघटनेची ताकद व जनसंपर्क वाढवण्याचा नवा ठराव मंजूर झाला. पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आणि स्थानिक जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे ठरवले. भाजपने पुढील काळातील कार्याची रूपरेषा ठरवत लोकाभिमुख निर्णय घेण्याचे ठोस धोरण बैठकीत घोषित केले. या बैठकीमुळे पक्षाच्या कार्यास नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे

यावेळी संग्राम थोपटे (मा.आमदार भोर विधानसभा), धर्मेंद्र खांडरे (पुणे जिल्हा प्रमुख पदवीधर मतदारसंघ), शेखर वढणे (पुणे जिल्हाध्यक्ष दक्षिण), जीवन कोंडे (पुणे उपजिल्हा अध्यक्ष), संतोष धावले (भोर तालुका अध्यक्ष उत्तर), रवींद्र कंक (भोर तालुका अध्यक्ष दक्षिण), माणिक शिळीमकर (शेतकरी संघटना उपाध्यक्ष), सुरज चव्हाण (भोर तालुका युवा अध्यक्ष), यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!