ताज्या घडामोडी

राजगड सहकारी साखर कारखाना ऊस लागवड विकास कार्यक्रम प्रचार शुभारंभ मा.आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते संपन्न


 

भोर : भोर राजगड मुळशीचे मा.आमदार व राजगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन संग्राम थोपटे यांच्या शुभहस्ते कारखान्याच्या ऊस लागवड विकास कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रचार रथाचे पूजन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

कारखान्याचे विद्यमान चेअरमन मा.आमदार श्री.संग्रामदादा थोपटे यांच्या अथक प्रयत्नातून महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम नवी दिल्ली यांच्या मार्फत ४६७ कोटी रुपये इतके कर्ज मंजूर केले आहे. सदर रक्कमेतून दैनंदिन ३५०० मे.टन गाळप क्षमतेचा नूतन कारखाना व डिस्टिलरी प्रकल्प यांची उभारणी करण्यात येणार असून, १२ मेगाव्हेट सहवीज निर्मिती प्रकल्प व सी.एन.जी.गॅस प्रकल्प तयार करण्याचा विद्यमान चेअरमन संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. सदर गाळप क्षमतेला अनुसरून ऊस उपलब्ध होणे गरजेचे असून ऊस उत्पादक सर्व शेतकरी सभासदांसाठी कारखान्याच्या माध्यमातून राजगड ऊस लागवड योजना राबविण्यात येत आहे.

Advertisement

या योजनेच्या प्रचार व प्रसार रथाच्या माध्यमातून शेतकरी वर्गात ऊस लागवडी विषयी माहिती पोहोचवून, रोपवाटिकेच्या मार्फत योग्य जातीचे निकोप रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर लागणारी खते, औषधेही वेळोवेळी शेतकऱ्यांना जागेवर पोहोच केली जाणार असून विविध तज्ञ मार्गदर्शकांमार्फत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन मा.आमदार संग्रामदादा थोपटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

यावेळी राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक के.डी.भाऊ सोनवणे, सुभाषराव कोंढाळकर, सुधीरराव खोपडे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अतुल किंद्रे, मा.उपसभापती रोहन बाठे, यांच्यासह भगवान भांडे, माऊली पांगारकर आदीसह शेतकरी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!