प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुका मा.अध्यक्ष संतोष मोहिते यांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
किकवी : प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुका मा.अध्यक्ष व शिवप्रहार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष मोहिते यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये रविवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी शिवाजीराजे इंजिनिअरिंग कॉलेज, धांगवडी, ता.भोर येथे मा.आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत जाहिर प्रवेश केला.
संतोष मोहिते यांच्या भाजप प्रवेशामुळे भोर तालुक्यातील भाजपा संघटना अधिक मजबूत होईल आणि स्थानिक पातळीवर पक्षाला मोठे बळ मिळेल. तसेच त्यांचा राजकीय अनुभव, आक्रमकपणा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उपयोगी ठरेल.
मा.आमदार संग्राम थोपटे
भाजपाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीमुळे तसेच विकासाचा महामेरू मा.आमदार संग्राम थोपटे यांच्या कामच्या कार्यशैलीमुळे प्रभावीत होऊन भाजपात प्रवेश केला असुन पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार केला आहे.
संतोष मोहिते.
अध्यक्ष – शिवप्रहार संघटना महाराष्ट्र राज्य
या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला संतोष मोहितेमुळे निश्चित फायदा होणार असल्याचे जाणकारांची मत आहे.




