पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर ! अखेर उमेदवारांची प्रतीक्षा संपली
पुणे : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आरक्षण सोडत कधी होणार असा प्रश्न इच्छुक उमेदवानकडून सतत करण्यात येत होता. अखेर याबाबतची प्रतीक्षा संपली आहे. राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३३६ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी १३ ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडतीची सूचना १० ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी वृत्तपत्रात प्रसिध्द करणार आहेत, जिल्हा परिषदेसाठी आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयत जिल्हाधिकाऱ्यांनी तर भोर पंचायत समितींसाठी तहसीलदारांनी १३ ऑक्टोबर पर्यंत तालुक्याच्या ठिकाणी काढणार आहेत. प्रारुप आरक्षणाची अधिसूचना १४ ऑक्टोबरला प्रसिध्द करण्यात येईल.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर १४ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आरक्षण बाबत काही हरकती व सूचना दाखल करता येऊ शकतात, आरक्षणवर आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करून ३ नोव्हेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.