भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) ! सामाजिक न्याय विभाग अध्यक्षपदी तेजस मोरे यांची निवड
भोर : उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भोर विधासभा आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थतीत, मा. पुणे परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली तेजस मोरे यांची भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामजिक न्याय विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
अविनाश गायकवाड यांनी तेजस मोरे यांची अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामजिक न्याय विभाग भोर शहर अध्यक्ष म्हणून निवड जाहिर केली आहे. तेजस मोरे यांचे भोर शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात युवकांचे मोठे संघटन आहे. रणजित शिवतरे यांचे निकटवर्ती मानले जाणारे व भोर शहरात आंबेडकर संघटनांमध्ये त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.
यापूर्वी त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षामध्ये वेगवेगळ्या पदांवर महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. निवडीबद्दल तेजस मोरे यांच्यावर भोर शहरासह तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.