भोर बसस्थानकात एसटी बस खाली आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
सुनिल सावंत भोर,प्रतिनिधी
भोर : 15/7/2024 (सोमवार) एसटी बस खाली आल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना भोर बसस्थानकात घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने या प्रकरणी एसटी बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच भोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व भोरच्या रामबाग येथील उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
हा तरुण भोर बस स्थानकात जात असताना एसटी बस चालु होती त्या बस समोरून जात असताना एसटीची ठोकर लागल्याने तो एसटी खाली आला व त्याचे चाक तरुणाच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असुन, तरुणाचे नाव रुपेश गायकवाड राहणार पोलादपूर जिल्हा रायगड असे आहे, तरी या तरुणा विषयी माहिती किंवा त्याच्या कोणा नातेवाईकाचा संपर्क असल्यास भोर पोलीस स्टेशनला कळवण्याचे आव्हान केले आहे.




