संत सोपानकाका पालखी सोहळ्यात बीव्हीजी 108 अत्यावशक सेवा देणारे डॉ.मंदार माळी यांची उल्लेखनीय कामगिरी
आषाढी एकादशी वारी निमित्त विठूमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी बीव्हीजी १०८ अत्यावश्यक सेवा किकवी सबसेंटर इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉ मंदार सुरेश माळी यांचे कौतुकास पात्र असे काम चालु आहे.
कर्तव्या बरोबर विठुमाऊलीच्या चरणी सेवा करण्याचा योग आल्याने तसेच वारकऱ्यांची वैद्यकीय कोणत्याच प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणुन सेवा करण्यास कायम तत्पर असतात.
डॉ.मंदार माळी सर आणि त्यांचे सहकारी इमर्जन्सी असिस्टंट दामोदर अहिरे यांनी संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा सासवड ते पंढरपूर या वारी मध्ये दिवस-रात्र सेवा देऊन आतापर्यंत ६९ इमरजेंसी रुग्णांना हॉस्पिटलमध्ये सुखरुप नेले आहे. तसेच OPD मध्ये ९१८ प्लस रुग्णांना थंडी,ताप,खोकला, अंगदुखी, पायदुखी. अशा आजारावर उपचार करून सेवा पुरवण्याचे काम केले आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने डॉ.मंदार माळी सर सालाबाद प्रमाणे या ही वर्षी विठुमाऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांसाठी पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी मोफत आरोग्य सेवा देत आहेत.
श्री संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळ्यात डॉक्टर मंदार माळी सर यांची सेवा पाहून भोर तालुक्यातील राजकीय मंडळी किंवा सांप्रदायिक मंडळी असो सरांच्या सेवे बाबत समाधान व्यक्त करुन त्यांचे कौतुक करत आहेत.
- नुकताच भोर पंचायत समितीचे उसभापती रोहन बाठे यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांचा सेवाभावी कामाबद्दल सत्कार केला व पुढे त्यांच्या कडुन जास्तीत-जास्त वारकऱ्यांची सेवा घडावी यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.




