ताज्या घडामोडी

कापुरहोळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक वासरू ठार,तर एक जखमी


भोर : दि. 11/08/24 (रविवार)  कापुरहोळ येथील साळोबा वस्ती येथे राहणारे शेतकरी सटवा गायसमुद्रे व त्यांचा मुलगा किरण गायसमुद्रे हे नेहमी प्रमाणे सकाळी त्यांच्या घराजवळील गोठ्याच्या आवारात बांधलेल्या वासरांच्याकडे गेले असता, बिबट्याने त्यांच्या 2 वासरानवर हल्ला केला असल्याचे निदर्शनास आले, त्यामध्ये 1 वासरू ठार करुन अर्धे खाल्ले असुन, 1 जखमी अवस्थेत होते.

दोन-तीन दिवसांपासुन मिसाळवाडी, केतकवळे, कुंभोशी, दिवळे,कापुरहोळ अशा वेगवेगळ्या भागांमध्ये शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे, तर काही ठिकाणी भटकक्या कुत्र्यांना बिबट्याने लक्ष बनवले आहे. दोन दिवसापूर्वीच बिबट्याचे दर्शन कुंभोशीच्या शिवारात गुरे चारणाऱ्या गुरख्यांना झाले असल्याचे माहिती स्थानिकांनी दिली.

Advertisement

या हल्ल्याची माहिती मिळताच वीर धाराऊमाता ट्रस्टचे अध्यक्ष अमित गाडे यांनी त्याठिकाणी जाऊन किरण गायसमुद्रे या शेतकऱ्याची भेट घेतली व वनविभागातील वनरक्षक अवधूत गुजर यांना फोन केला व झालेल्या घटनेची माहिती दिली असता, त्यांनीही घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पंचनामा करुन वरिष्ट अधिकाऱ्यानंकडे पाठीवला आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्याण्याची मागणी अमित गाडे व स्थानिक रहिवाशांनी वनविभागाकडे केली आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!