ताज्या घडामोडी

विजेचा शॉक लागुन एकाच कुटुंबातील तिघांचा दुदैवी मृत्यू


 

दौंड प्रतिनिधी.                                                           चेतन सुर्यवंशी

 

दौंड: 17 /06/24 (सोमवार) दापोडी, ता.दौंड,जिल्हा पुणे. गावात घरगुती विजेचा धक्का बसून एकाच कुटुंबातील आई-वडिल, मुलगा या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

पुण्यात दौंड तालुक्यात दापोडी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. विजेच्या शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. आंघोळ करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला विजेचा शॉक लागला. त्याच्या आवाजाने त्याची पत्नी देखील धावली. तिला ही शॉक लागला तर त्यांचा मुलगा देखील त्यांना वाचवण्यासाठी धावला असता त्यालाही शॉक लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे दापोडी गावावर शोककळा पसरली आहे.

Advertisement

दापोडी गावातील अडसूळ यांच्या घरामध्ये भाड्याने राहणारे  1) सुरेंद्र भालेकर वय (४५) 2) राधिका भालेकर वय (३८)  3) प्रसाद भालेकर वय (१९) या एकाच घरातील तिघांना घरातील विजेचा धक्का बसून जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

प्राथमिक माहिती नुसार महावितराणाची वायर घराच्या वरुन गेली असल्याने ती वायर घराच्या पत्र्याला टच झाल्याने तिच्यातील विद्युत प्रवाह घरांमध्ये उतरला यामुळे ही दुर्घटना घडली.

त्याची एक मुलगी काही कारणास्तव घराबाहेर गेल्यामुळे ती यातून सुखरूप वाचली. भालेराव कुटुंब हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून उदरनिर्वाहासाठी दौंड तालुक्यातील दापोडी येथे वास्तव्यास आले होते. संबंधित घटनेचा पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख करत आहेत.

 

<

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!