ताज्या घडामोडी

भोर शहरात राष्ट्रवादी नगराध्यक्षपदाचे उमेदवार रामचंद्र आवारेना मोठया प्रमाणावर जनसमर्थन ! डोअर टू डोअर भेटींना उदंड प्रतिसाद


 

भोर – भोर शहरात नगराध्यक्ष पदाचे अधिकृत राष्ट्रवादी उमेदवार रामचंद्र श्रीपती आवारे यांच्या प्रचारात जोरात तयारी दिसून येत आहे. शहरात डोअर टू डोअर भेटी घेत मतदारांशी संवाद साधत त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवून मोठा प्रचार मोहीम उभारली आहे. या प्रचार मोहिमेत राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते एकत्रितपणे राबत आहेत.

रामचंद्र आवारे यांनी माणसांच्या घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला असून मी प्रत्येक समाज, जाती-धर्माच्या गरजा लक्षात घेऊन शहराचा सर्वांगीण विकास करू असे ठाम मत व्यक्त केले. ते म्हणाले की जर लोकांनी माझ्या प्रयत्नांना हक्काचा आधार दिला तर मी विश्वासाने काम करेन आणि भोर शहराला जलद विकासाच्या दिशेने नेईन.

Advertisement

”राष्ट्रवादी पक्षाच्या या प्रचारात विद्यमान आमदार शंकर मांडेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक भालचंद्र जगताप, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, माजी उपसभापती विक्रम खुटवड, माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंदकांत बाठे, भोर तालुका अध्यक्ष संतोष घोरपडे, सामाजिक न्याय अध्यक्ष अविनाश गायकवाड आदी नेत्यांचा मोठा सहभाग आहे. या मोठ्या नेतृत्वाच्या पाठिंब्याने पक्षाच्या उमेदवारांना शहरातील विविध समाजांतून प्रचंड प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे.

.पक्षाचे पदाधिकारी जनतेला निवडणुकीत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. भोरच्या नागरिकांनी मतदानाची जबाबदारी ओळखून राष्ट्रवादी पक्षाचा आणि त्याच्या उमेदवारांचा विश्वास जपावा. हा शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णायक टप्पा आहे असे त्यांनी नमूद केले.

राजकीय विश्लेषकांच्या मते, रामचंद्र आवारे यांची प्रचारशैली आणि जनता जवळ जाऊन संवाद साधण्याचा मार्ग यामुळे भोर शहरातील निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या यशाच्या शक्यता अधिक दृढ होत आहेत. भोरच्या समृद्धीत आपणही सहभागी होऊन मतदानाचा भाग घ्या आणि आपल्या शहराचा विकास सुनिश्चित करा, असे आवाहन ते करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!