समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालय हिर्डोशी येथे संविधान दिन मोठ्या उत्सवात साजरा
वसंत मोरे,
प्रतिनिधी.
भोर : समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालय, हिर्डोशी येथे दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी मनोगत व्यक्त केले आणि संस्थेवरील प्रास्तविक वाचन केले. सर्व शिक्षक-विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन संविधानाचे स्नेहपूर्वक पूजन केले.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. हांडे मॅडम यांनी संविधानाचे सामाजिक आणि राष्ट्रीय महत्त्व स्पष्ट करताना या दिवसाचे आवर्जून साजरे करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी सर्वांना आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या.
संविधानाचा अर्थ आणि त्यातील महत्व डांगे सरांनी विद्यार्थ्यांसमोर समजावून सांगितले, तर कुडले सर आणि माकर सर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.संवेदना संस्था तर्फे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रांजणे सर व राजेशिर्के सर यांनी प्रभावीपणे केले.
शिक्षक आणि विद्यार्थी संविधान दिनाच्या या उपक्रमातून देशभक्तीची भावना अधिक दृढ करताना, ‘वंदे मातरम्’ म्हणत कार्यक्रमाचा समारोप झाला. या आयोजनातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची माहिती व त्याचे मूल्यमापन वाढीस लागले.




