ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; खेडशिवापूर – कोंढणपुर रस्त्यावर अपघात
खेडशिवापूर : 25 जानेवारी 2025 शनिवार खेड शिवापूर – कोंढणापूर रस्त्यावरील सकाळीं 10 वाजता आर्वी गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात बैनी गोपाल (वय 30 वर्ष ) मुळगाव उत्तरप्रदेश सध्या राहणार रांझे, ता.भोर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बैनी गोपाल स्वतः UP 96 M 9282 क्रमांकाच्या दुचाकीने काही कामानिमित्त खेडशिवापूरहून कोंढणपुरकडे येत असताना, कोंढणपुरहुन येणाऱ्या भरधाव ट्रकची त्यांच्या दुचाकीला सामोरासमोर जोरदार धडक दिल्यामुळे या अपघातात ते गंभीर जखमी अवस्थेत असल्यामुळे वेळीच स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर राजगड पोलीस ठाण्यात ट्रक ड्रायव्हरच्या विरोधात फिर्याद नोंदवण्यात आली. ट्रक नंबर MH 13 R 2040 ट्रकचालक मोईनुद्दीन शेख (वय 36 वर्ष) सध्या राहणार क्रांतीवीर नगर थेरगाव पुणे, मूळगाव परभणी यांच्याविरुद्ध भादंवि कलम BNS 281,106,125 (A) 125 (B) 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून राजगड पोलिसांनी त्यांला ताब्यात घेतले असुन घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अमलदार शिरसाट, तपासी अंमलदार मेस्त्री करत आहेत.




