स्पोर्ट्स

पुण्याच्या भाग्यश्री फंडला यंदाचा महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी : कोल्हापूरच्या अमृता पुजारीला केले चितपट


वर्धा : 25 जानेवारी 2025 (शनिवार) देवाळीमधील रामदास तडस इनडोर स्टेडियमला झालेल्या महिला महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना पुण्याच्या भाग्यश्री फंड व कोल्हापूरची अमृता पुजारी त्याच्यामध्ये झाला, सामन्यांमध्ये 2-4 च्या फरकाने भाग्यश्रीने अमृताचा पराभव केला व महिला महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरले. जिंकलेल्या कुस्तीपटूला महिला महाराष्ट्र केसरी किताब 2025 आणि मानाची गदा तसेच रोख बक्षीस मिळाले.

Advertisement

भाग्यश्रीने स्पर्धा जिंकल्यानंतर माध्यमांसमोर आपला आनंद व्यक्त केला व या विजयाचे सर्व श्रेय तिला वेळोवेळी मिळालेल्या सहकार्याबद्दल तिचे पती, आई- वडील यांना दिले, तसेच प्रशिक्षक इतर सहकाऱ्यांच्या  मिळालेल्या पाठीब्याबद्दल तिने सर्वांचे आभार मानले, महाराष्ट्र महिला महाराष्ट्र केसरीचे आयोजन अतिशय सुंदर केले होते, असेच अयोजन दर वेळी व्हावे त्यामुळे देशात कुस्ती स्पर्धा वाढेल तसेच मुलींचा स्पर्धेतील सहभाग वाढू शकतो तो आजही वाढत आहे ही चांगली बाब आहे सरकारने खेळाडूंची जीतकी आर्थिक मदत करता येईल तितकी करावी असे आव्हानं तिने सरकारला केले आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मानतेने ही महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, माजी खासदार व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी यंदाची ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता प्रयत्न केले.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!