महाराष्ट्र

वासुदेवाच्या हातातील पाटी पाहून रस्त्यावरचे सर्वच अचंबित ; सांताक्लॉज मलाही आवडतो पण…


महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावातून काही वर्षात वासुदेव हरवत चालला आहे. आधीच्या काळी सकाळची सुरुवात वासुदेवाच्या गाण्याने होत असे, मात्र आता अनेक मुलांना वासुदेव म्हणजे हे कोण माहिती नसते, पंरतू सोशल मीडियावर वासुदेवाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, एक तरुण वासुदेवाच्या वेशात हातात एक पाटी घेऊन भर रस्त्यात उभा राहिला आहे. यावेळी पाटीवरचा मेसेज वाचाण्याकरिता सगळेच थांबत होते.

हिंदू संस्कृतीमध्ये वासुदेवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. समाज प्रबोधन करणारी एक संस्था आहे. कायम आपल्या गीतातून तत्त्वज्ञान सांगितले जाते. चांगले काम करावे आणि चांगल्या वाईट अनुभवाचीची शिदोरी परमेश्वरावर सोपवावी हा दृष्टीकोन वासुदेव देतात.

Advertisement

वाचकांना काही प्रश्न पाडले असतील या पाटीवर असं नेमकं काय लिहिलं असेल ? तर वासुदेवाच्या हातातील या पाटीवर “सांताक्लोज मलाही आवडतो तो नक्कीच आपल्या मुलांना दाखवा, पण त्यासोबतच हरवत चाललेला आपला वासुदेवही एकदा आठवा” अशा प्रकारचा मेसेज लिहला होता, आपली संस्कृती आपली जबाबदारी अशा प्रकारचा मेसेज थोडक्यात यातून देण्यात आला होता, सांताक्लॉज च्या नादात आमचा वासुदेव हरवला कधीकाळी वासुदेव पाहणारी कदाचित आमची ही शेवटची पिढी असेल अशी प्रतिक्रिया महिला व पुरुष देत होते.

महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावातून वासुदेव हरवत गेला आहे. आधीच्या काळी सकाळची सुरुवात वासुदेवाच्या गाण्याने होत असतं. मात्र आता अनेक मुलांना वासुदेव म्हणजे हे कोण माहिती नसते, पंरतू सोशल मीडियावर वासुदेवाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, त्यानं हातात एक पाटी घेऊन भर रस्त्यात उभा राहिला आहे. यावेळी या पाटीवरचा मेसेज वाचून सगळेच थांबू लागले आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!