आई-वडिलांची दोन मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन चिखलातुन तब्बल 15 कि.मी.ची पायपीट
यलाप्पा तेलतुंबडे, प्रतिनिधी.
गडचिरोली : येरांगडा, ता. अहेरी, जि.गडचिरोली येथील एक आदिवाशी कुटुंबात दुर्दैवी घटना घडली,रमेश वेलादी नामक ग्रस्त पत्नी व दोन मुलानं बरोबर याठिकाणी राहात असुन, बैल पोळ्याच्या सणामुळे ते संपुर्ण कुटुंब मुलांच्या मामाच्या गावाला गेले होते,
आजोळ गावी राहिल्यानंतर दोन भावडांना ताप आला होता. अशिक्षित आई वडिलांनी त्यांना दवाखान्यात नेण्याऐवजी पुजाऱ्याकडे नेले होते, अन् तेथेच घात झाला. दोन तासात दोघांची प्रकृती खालावली असंल्याने त्या दोघांना पावसात, चिखलातून 15 किमी अंतर पायी जात आई-वडिलांनी प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा गाठलं होत. पण त्यांचा उपचाराकरिता खुप उशिर झाला होता. प्राथमिक आरोग्य प्रमुखांनी दोघांना ही मृत घोषित केले, त्यानंतर त्यांना प्राथमिक केंद्राकडून मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळणे अपेक्षित होते. मात्र रुग्णवाहिका न मिळु शकल्यामुळे आई वडिलांना आपल्या दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन चिखलातुन तब्बल 15 किलोमीटर पायपीट करत पुन्हां आपल्या गावी जावे लागले. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यात ही घटना घडली आहे. आजही आदिवाशी संघर्ष करत आहेत, आरोग्य व्यवस्था नाही, रस्ते नाही, शिक्षणासाठी कोणतीही शाळा नाही. या घटनेमुळे पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे भीषण वास्तव्य समोर आले आहे.