एस टी कर्मचाऱ्यांचा संप दोन दिवसानंतर मागे : मुख्यमंत्र्याच्या बरोबर झालेल्या बैठकीत निर्णय
मुंबई : गणेश उत्सवाकरिता राज्य परिवहन महामंडळ (ST) ची विशेष वाहतुक सेवा सुरू होताच, एस टी कर्मचाऱ्यानी मंगळवारी संप पुकारला होता,त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यभरातील प्रवाशांचे हाल चालु होते.
प्रमुख मागणी सातवा वेतन आयोग लवकरात-लवकर लागु करावा त्याच बरोबर विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी दोन दिवसा पासून धरणे आंदोलन सुरू केले होते, परिणामी राज्यभरातील एसटी वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती, दरम्यान मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकी नंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली.
बैठकीत शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत गांभीर्याने विचार करून मागण्या मान्य केल्या आहेत, विशेष म्हणजे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनासह साडेसहा हजाराची वाढ केली आहे, शासनाने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयामुळे ती कर्मचारी समाधानी असल्याचे मान्य केले, या झालेल्या बैठकीतून सर्वसामान्य प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.




