काशीयात्रा आणि सोमवती अमावस्याचे अवचित साधुन 3000 यात्रेकरुच्या साक्षीने किरण दगडे पाटलांची गंगा महाआरती
बावधन : स्वतःच्या वृद्ध आई वडिलांची सेवा करणारा आदर्श पुत्र श्रावणबाळाची कथा आपण सर्वांनी लहानपणापासुनच ऐकली आहे, प्रत्येक धर्मात आई-वडिलांना देवासमान दर्जा दिला जातो, तीर्थयात्रेला हा श्रावणबाळ आई-वडिलांना घेऊन जातो, पण आजच्या युगात असा श्रावणबाळ असु शकतो का.?
पुण्यामध्ये किरण दगडे पाटील याच्या रूपाने एक आधुनिक श्रावणबाळ आहे, सोशल मिडियावर सद्या या आधुनिक युगातील श्रावणबाळ चर्चेचा विषय झाला आहे, मिडिया,जाहिरातीपासुन लांब राहणे पसंत करतो, भोर,राजगड (वेल्हा),मुळशी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांनाच आई-वडीला समान माणुन त्यांच्यासाठी स्वतः काशीदर्शनाचे मोफत आयोजन करत असतो.
भोर विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी आयोजित मोफत काशीयात्रा नुकतीच पार पडली. चौथ्या टप्यातील या यात्रेसाठी खडकी रेल्वे स्टेशन वरून प्रस्थान केले. तीन हजार सर्वसामान्य नागरिकांना घेऊन काशी तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवले, येथे काशी विश्वनाथ तसेच काळभैरवाचे दर्शन घेऊन सोमवती अमावास्याचे अवचित साधुन सामूहिक गंगा महाआरती केली. एकच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने झालेल्या सामूहिक गंगा महाआरतीने भक्तीमय वातावरण झाले होते, यावेळी काशीतील गंगा सेवा निधी संस्थेने या श्रावणबाळाच्या आध्यात्मिक कार्याची दखल घेऊन त्याचा विशेष सत्कार करून भविष्याच्या कार्याकरिता शुभेच्छा दिल्या.
आयुष्यात एकदा तरी काशी यात्रा घडावी हे अनेक लोकांचं स्वप्न असते ते पुर्ण करण्याचे काम त्यांचा हा आधुनिक श्रावणबाळ किरण दगडे पाटील करत आहे, त्यांनी आत्ता पर्यंत 12000 सामान्य नागरिकांना यात्रेच्या माध्यमातुन दर्शन घडवले आहे, हे सर्व करत असताना स्वतः किरण दगडे पाटील त्यांचे कुटुंब व मित्र परिवार या सर्वाना अध्यात्मिक व मानसिक समाधान मिळते. संपूर्ण रेल्वे प्रवासात कुणाचीही गैरसोय होणार नाही याकडे स्वतः तीर्थस्थानी, धार्मिक मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणीवपुर्वक लक्ष देणे, वाहतुक व्यवस्था करणे, अशी योग्य ती काळजी घेतो, यात्रेकरूंना सकाळी चहा,नाष्टा, दुपारी जेवण, सायंकाळी चहा,नाष्टा,रात्रीचे जेवण वगैरे अगोदर खायला घालतो,नंतर स्वतः खात असतो, संपुर्ण यात्रेमध्ये त्यांची सर्वपरी काळजी घेतो, या संपूर्ण उपक्रमाच्या नियोजनात त्याचे कुटुंब, सहकारी मित्रांची त्याला योग्य साथ असते.
स्वराज महाराष्ट न्यूज़शी या श्रावणबाळा विषयी बोलताना यात्रेला गेलेल्या काही माता म्हणत होत्या की आजच्या युगात जिथे आई-वडिलांना वृद्ध आश्रमात ठेवणारी मुलं आहेत, आणि दुसरीकडे हा श्रावणबाळ आहे, जो आमच्या मुला प्रमाणेच आमची सेवा करत असतो, अशा आदर्श पुत्राचे आई-वडील खरंच भाग्यवान आहेत, जिच्या पोटी जन्म घेतला त्या मातेला आमचा दंडवत प्रणाम. आम्हांला ही या श्रावणबाळा बरोबर काशीयात्रेला जाण्याचे भाग्य लाभल्याने आम्ही धन्य झालो आहोत, पुढे त्यांनी बोलताना या श्रावण बाळाला दीर्घायुष्य लाभो सर्व इच्छा पुर्ण होवोत, तसेच तोंडभरून कौतुक केले,व शुभ आशीर्वाद दिले.




