क्राईम

बेपत्ता दोन चिमुकल्या बहिणींचे मृतदेह पाण्याच्या बॅलरमध्ये सापडले ; अत्याचार करुन खुन केल्याचा संशय


राजगुरुनगर : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरातून बुधवारी 25 डिसेंबर रोजी दुपारी बेपत्ता झालेल्या दोन चिमुकल्या मुलींचे मृतदेह चिन्ह भिन्न अवस्थेत आढळून आले आहेत, कार्तिकी सुनील मकवाने वय वर्ष 9 व दुर्वा सुनील मकवाने वय वर्ष 8 अशी मुलींची नावे आहेत वाडा रोडवर एका मोठ्या वरदळीच्या रस्त्यावर ज्या ठिकाणी या मुली राहत होत्या त्याच्या लगत राहत असलेल्या 6 परप्रांतीय मुलांच्या काही अंतरावर असलेल्या खोलीत पोलिसांना मुलींचे मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement

कार्तिक आणि दुर्वा या दोघी बुधवारी दुपारी घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाल्या होत्या त्यांच्या पालकांनी त्या गायब झाल्यावर सायंकाळी राजगुरुनगर पोलीस रात्री गुन्हा दाखल केला होता, त्यांचे आई वडील मोलमजुरीसाठी या ठिकाणी वास्तव्य करत होते, पोलिसांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाल्यानंतर आरोपींचा शोध घेतल्यावर बार मध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झाडाझडती घेतली गेली तेव्हा गुडघाभर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये दोन्ही मुलींचे मृतदेह चिन्हभिन्न अवस्थेत आढळून आले, राजगुरुनगर पोलीसानी दोन्ही मुलींचे मृत्यू शविच्छेदन करण्यासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवले असून बेपत्ता झालेल्या या दोन्ही मुलींसोबत काय झाले याचा तपास पोलीस करत आहेत.

राजगुरुनगर येथील धनराज बार मध्ये काम करणाऱ्या वेटरने अत्याचार करुन खून केला असून पहाटे 4 च्या सुमारास पुण्यातील एका लॉजवरून त्याला अटक केली आहे, संशयित आरोपी 50 ते 55 वर्षे वयाचा असुन अधिकचा तपास राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!