कोरेगावभीमा मध्ये 15 लाख भीम अनुयायांची विजयस्तंभाला वंदना
कोरेगांवभीमा : देशाभरातील आंबेडकर अनुयायांचे स्फूर्तीस्थान असलेले कोरेगाव भीमा विजयस्तंभ येथे 1 जानेवारी 2025 रोजी 207 वा शौर्य दिन साजरा झाला, विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातून 15 लाखाच्यावर भीम अनुयायी उपस्थित होते. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमित कुमार यांच्या उपस्थितीत महार रेजिमेंटच्या निवृत्त जवानांच्या वतीने मानवंदना देण्यात आले.
1जानेवारी 1818 मध्ये 207 वर्षांपूर्वी कोरेगाव भीमायेथे झालेल्या लढाईमध्ये महार समाजातील सैनिकांच्या पराक्रमामुळे ब्र जुलमी पेशव्यांचा पराभव झाला होता, 1 जानेवारी 1927 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला, तेव्हापासून याठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली.
बुधवारी 1जानेवारी 2025 रोजी 207 व्या विजयदिनी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन केले होते. समता सैनिक दलासह महार रेजिमेंट कडून विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन पीपल पार्टीचे जोगेंद्र कवाडे, बामसेफचे वामन मेश्राम, भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद, माजी मंत्री नितीन राऊत, कॅबिनेटमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार संजय बनसोडे, आमदार राजकुमार बडोले, भीमराज आंबेडकर, प्रकाश गजभिये, आमदार बापूसाहेब पठारे, आनंदराज आंबेडकर यांसह इतर नेत्यांनी भेट देत विजयस्तंभाला अभिवादन केले.