भोर विधानसभा मतदारसंघातून 23 उमेदवारी अर्ज पैकी 15 अर्ज वैद्य
भोर : 30/10/24 (बुधवार) भोर विधानसभा मतदारसंघातून एकूण 23 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले होते, त्यापैकी 8 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैद्य ठरले असून त्यामध्ये 1) स्वरूपा थोपटे 2) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रणजीत शिवतरे 3) भाजपचे शरद ढमाले 4) भाजपचे जीवन कोंडे 5) वंचित बहुजन आघाडीचें अभिषेक वैराट, 6) अपक्ष भरत शेडगे 7) रामचंद्र मानकर 8) अनिल सपकाळ या उमेदवारांच्या समावेश आहे.
एकूण 15 उमेदवारांची अर्ज वैद्य ठरविण्यात आले असून त्यामध्ये 1) काँग्रेसचे संग्राम थोपटे 2) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर 3) सैनिक समाज पार्टीचे अनिल जगताप, 5) दलित शोषित पिछडावर्ग अधिकार दल पक्षाचे लक्ष्मण कुंभार 6) अपक्ष कुलदीपतात्या कोंडे 7) किरण दगडे 8) पियुषा दगडे 9) प्रमोद पंडित 10) बाळासाहेब चांदेरे 11) भाऊ मरगळे 12) राहुल पवार 13) सचिन देशमुख 14) समीर पायगुडे 15)सूर्यकांत माने 16) संजय भेलके यांचा समावेश असून प्रत्यक्षात 4 नोव्हेंबर ला उमेदवारी अर्ज आघार घेण्याचा मुदत दिवस असल्याने कोण कोणते उमेदवार माघार घेतील आणि कोण उमेदवार अर्ज कायम ठेवतील त्यानंतरच स्पष्ट विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकूण किती उमेदवार निवडणूक लढवतील हे स्पष्ट होईल.




