कापूरहोळ पंचक्रोशीमध्ये पृथ्वीराज थोपटे यांचा प्रचाराचा झंझावात
”
कापूरहोळ : दि. 28/10/24 (सोमवार) भोर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारा निमित्त त्यांचे सुपुत्र पृथ्वीराज थोपटे यांचा प्रचाराचा झंझावात चालु असून, कापूरहोळ गावामध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले, मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामध्ये महिला, तरुण व ज्येष्ठ मतदारांचा समावेश असल्याचे चित्र आहे.
पृथ्वीराज थोपटे यांचे ठिकठिकाणी मतदारांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. भोर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संग्राम थोपटे यांना महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांनी गुरवारी (दि.24) ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर त्यांनी गावे, वाड्यांमधील प्रमुख कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला, तरुण मंडळी यांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
पृथ्वीराज थोपटे हे पक्षाची ध्येयधोरणे, गोरगरीब, सामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून पक्षाने कशा पद्धतीने काम केले आहे, याची माहिती मतदारांपर्यंत रुजविण्याचे काम करत आहेत. पक्षातील प्रमुख नेत्यांनी केलेले लढे व संघर्षामुळे सर्वसामान्यांना कसा न्याय मिळाला, याची माहिती देखील देण्यात येत आहे. दरम्यान, तोच वारसा पुढे नेण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगत आहे, तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई वीर धाराऊ माता गाडे यांच्या स्मारकाचे लवकरात लवकर काम पुर्ण करण्यात येईल अशी आश्वासन दिले.
यावेळी युवानेते पृथ्वीराज थोपटे, सभापती लहूनाना शेलार, राजगड कारखान्याचे व्हाईस चेअरमन पोपटराव सुके, उपसभापती रोहन बाठे, कापूरहोळ गावचे सरपंच पंकज (बाबी) गाडे, मा. सरपंच किरण गाडे, मा. सरपंच योगेश गाडे, उपसरपंच गुलाबतात्या गाडे, हरिश्चंद्रीचे मा.सरपंच पांडुरंग गाडे,संत सोपानकाका दिंडी सोहळा कार्याध्यक्ष चंद्रकांत देवघरे, उद्योजक राजेंद्र गाडे, उद्योजक आनंद दळवी, उद्योजक अक्षयभैया सोनवणे, वारकरी संप्रदायचे संपतराव पाचकाळे, बाजार समिती सदस्य दत्तात्रय बाठे, सागर जगताप, ज्येष्ठ नागरिक सहदेव गाडे, सुदाम गाडे. महादेव गाडे महिला भगिनी, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.




