भोर, राजगड (वेल्हा), मुळशी विकासाच्या दृष्टीने बहुजन संवाद यात्रा : अभिषेक वैराट
नसरापूर : दि. 7/10/2024 (सोमवार) सकाळी 11.वाजता चेलाडी या ठिकाणावरून यात्रेचा प्रारंभ झाला, भोर राजगड (वेल्हा) आणि मुळशीच्या विकासाच्या दृष्टीने व संपूर्ण बहुजन समाजाशी संवाद साधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीच्या माध्यमातून अभिषेक संतोष वैराट यांनी बहुजन संवाद यात्रा सुरू केली आहे.
तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने, खेड शिवापुर टोल नाका हद्दपार करणे असेल,भोर,राजगड तालुक्यातील युवकांना तालुक्यातच रोजगार उपलब्ध करण्याचे, तालुक्यातील राजगड,तोरणा, रायरेश्वर,प्रचंड गड व इतर गडांच्या संवर्धन व दुरुस्ती करणे असेल, महिला सक्षमीकरणासाठी गावोगावी गृह उद्योग व इतर शासकीय उपक्रम असतील व तालुक्यातील होतकरू सुशक्तीत युवक व युवतींसाठी अभ्यासिका व मैदानी स्पर्धेसाठी उत्कृष्ट दर्जाची मैदान उपलब्ध करणे, तालुक्यातील आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा, नेटवर्क सुविधा अशा अनेक विषयांवर तालुक्यात संवाद साधण्यासाठी या यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे.
आज यात्रेचा पहिला दिवस होता, संवाद यात्रेला सुरुवात चेलाडी येथुन झाली व राजगड येथील मेंगाई चौक या ठिकाणी संपन्न झाली, या बहुजन संवाद यात्रेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, संवाद करत असताना एक गोष्ट लक्षात आली की तालुक्यातील जनतेला सुद्धा बदल हवाय व विकासासाठी कोणीतरी सर्वसामान्य घरातील तरुण युवकाची वाट तालुक्यातील जनता पाहत होती व ते अभिषेक संतोष वैराट यांच्या माध्यमातून मिळाली. बहुजन संवाद यात्रेत युवक, महिला व संपूर्ण बहुजन समाज सामील होत आहे.




