राजकीय

आम्ही देशात महागाई आणि भ्रष्टाचारांवर नियंत्रण मिळवले : नरेंद्र मोदी


पुणे : पुण्याने देशाला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संत, तसेच समाजसुधारक दिले.

काँग्रेस देशाला साठ वर्षात पायाभूत सुविधा देऊ शकले नाही, आम्ही दहा वर्षात दिल्या, आधुनिक इन्स्टास्ट्रक्चर, गावाकडील रस्ते, मेट्रो, विमानतळ,पालखीमार्ग, समृद्धी महामार्ग, वंदे भारत, दिले, काही दिवसात आपण बुलेट ट्रेनमध्ये बसताल.

 

पुण्यातील युवक बुद्धिमान आहे, प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे, ऑमोबाईल म्हटलं की पुणे असा नावलौकिक आहे, पुणे प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे.

काँग्रेसच्या डोळा तुमच्या संपत्तीवर आहे, आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या घरापत घुसून मारले, देशातील महागाई व भ्रष्टाचार नियंत्रित आणले, आम्ही येणाऱ्या पुढील काळामध्ये 70 वर्षां वरील व्यक्तींना मोफत उपचार देणार आहोत ही मोदीची गॅरंटी आहे, काही भटकत असणाऱ्या आत्मामुळे महाराष्ट्र स्थिर आहे, यांच्या महत्वकांक्षामुळे महाराष्ट्राचे काही मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत, असे नाव न घेता शरद पवार यांच्यवर टीका केली.

Advertisement

पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार मुरली मोहोळ, मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सौ. सुनेत्रा पवार  या महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या. असे आव्हान मतदारांना नरेंद्र मोदी यांनी केले, आपण दिलेले एक-एक मत मोदी ला जाणार आहे, मतदाना दिवशी पहिले मतदान फिर चाय पाण करा, जास्तीत – जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बाजावा.

आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला माझा नमस्कार व श्रीराम सांगा,असे आव्हान मोदींनी  मतदार राजाला केले.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!